Vidhan Bhawan Bomb Threat: विधान भवनाला मिसाईलनं उडवून देण्याची धमकी, सर्व कर्मचाऱ्यांना काढलं बाहेर

Bomb Threat
Bomb ThreatFile Photo
Published on
Updated on

Vidhan Bhawan Bomb Threat: मुंबईतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली असून त्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून त्यांनी विधान भवनातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं आहे. आता बॉम्ब शोध पथकाचे श्वान पथक विधान भवनाच्या परिसरात दाखल झाले आहेत.

विधान भवन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी ही ई-मेल द्वारे प्राप्त झाली होती. यानंतर पोलीस प्रशासनानं शोध मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, विधान सभेत सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू आहे. कालांतरानं विधान भवनाला मिसाईलनं उडवून देण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली.

विधान भवन बॉम्बने उडून देण्याची धमकी ही ई-मेलवर आली आहे. या ई-मेलचा तपशील अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला आहे. विधान भवनात अधिवेश सुरू असल्यानं तिथं २८८ आमदार, विधान परिषदेचे आमदार, उच्च पदस्थ प्रशाकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची ये-जा असते. त्यामुळं हा बॉम्ब थ्रेट प्रशासन गांभिऱ्यानं घेत आहे.

याबाबत बोलताना आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं की मी ज्यावेळी विधान भवनात आलो त्यावेळी मला सुरक्षा रक्षकांनी आत जाऊ दिलं नाही. त्यांनी विधान भवनात काहीतरी थ्रेट असल्याचं सांगितलं. आता डिव्हिजनची लोकं आत जाऊन तपास करत आहेत.'

दरम्यान, सुरक्षा अधिकाऱ्यांनी विधान भवनाची तपासणी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना हळूहळू आत सोडलं जात आहे. विधान भवानाचे १० वाजता सुरू होणारे कामकाज यामुळं पुढं जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news