FY Admission: एफवायची गुणवत्ता यादी 26 मे रोजी; मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

एफवायची पहिली गुणवत्ता यादी 26 मे रोजी जाहीर होणार असून 13 जूनपासून नियमित वर्गांना प्रारंभ होणार आहे.
FY Admission
FY AdmissionPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई विद्यापीठातील शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी पदवीच्या 3 आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. एफवायची पहिली गुणवत्ता यादी 26 मे रोजी जाहीर होणार असून 13 जूनपासून नियमित वर्गांना प्रारंभ होणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व महाराष्ट्र शासनाच्या 20 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयानुसार 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, 4 वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, 5 वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या https://muugadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे.

FY Admission
Bombay High Court verdict: मिरा-भाईंदरच्या 227 एकरवरील केंद्राचा दावा फेटाळला

बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. पदवीच्या प्रथम वर्षासाठी होणारे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या तरतुदी आणि मार्गदर्शक तत्वानुसार होतील.

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमित केलेल्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी. तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

एआयसीटी अंतर्गत असलेल्या बीएमएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही सीईटी सेल मार्फत घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

FY Admission
Politial News: हा भारताला वाचविणारा विजय: फडणवीस

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक

अर्ज विक्री : 6 मे ते 21 मे, 2026 (दुपारी 1.00 वाजेपर्यंत)

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी : 6 मे ते 21 मे (दुपारी 1.00 वाजेपर्यंत)

ऑनलाईन/ऑफलाईन ॲडमिशन फॉर्म सादर करणे : 6 मे ते 21 मे (1.00 वाजेपर्यंत)

पहिली मेरीट लिस्ट : 26 मे (सकाळी 11.00 वाजता)

ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : 27 ते 29 मे (दुपारी.3.00 वाजेपर्यंत)

द्वितीय मेरीट लिस्ट : 30 मे (संध्याकाळी 7.00 वाजता)

ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : 1 जून ते 3 जून (दुपारी.3.00 वाजेपर्यंत)

तृतीय मेरीट लिस्ट : 4 जून (संध्याकाळी 7.00 वाजता)

ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : 5 ते 9 जून

ऑफ क्लासेस/ ओरिएंटेशन : 13 जून 2026

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news