ई है बम्बई नगरीया तू देख बबुआ...

भारतासह संपूर्ण जगाला आकर्षित करणार्‍या मुंबईला पर्यटकांची पसंती
mumbai-top-choice-for-tourists-globally-including-india
ई है बम्बई नगरीया तू देख बबुआ...Pudhari File Photo
Published on
Updated on
राजेश सावंत

मुंबई : ‘डॉन’ चित्रपटातील अमिताभ बच्चनवर चित्रीत केलेले व किशोर कुमार यांनी गायिलेले... ‘ई है बम्बई नगरीया तू देख बबुआ...’ हे गाणे ऐकल्यावर मुंबई नगरीतील गेट वे ऑफ इंडिया, फ्लोरा फाऊंटन, सेंट्रल लायब्ररी, म्युझियम, राणीबाग, म्हातारीचा बूट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह मुंबई महापालिका व अन्य ब्रिटिशकालीन इमारती डोळ्यांसमोर चटकन दिसतात. मुंबईचे आकर्षण देशातीलच नव्हे, तर जगातील प्रत्येक नागरिकाला आहे.

1924 मध्ये गेट वे ऑफ इंडियाची इमारत बांधून पूर्ण झाली. याची रचना इंडो सारासेनिक शैलीत केली आहे. बेसॉल्ट दगडांनी बांधलेली ही कमान 85 फूट उंचीची आहे. एका बाजूला अरबी समुद्र, तर दुसर्‍या बाजूला पंचतारांकित हॉटेलसमोर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशा या भागाला दररोज 25 ते 30 हजारांपेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. येथून अलिबाग, मांडवा, एलिफंटा जाण्यासाठी फेरीबोट सेवा आहे. जवळच म्युझियम व जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, सेंट्रल लायब्ररी, राजाबाई टॉवर, मुंबई हायकोर्ट, फ्लोरा फाऊंटन, हुतात्मा चौक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय आदी ठिकाणी पर्यटकांना भेट देता येते.

राणी बागेत देशी-विदेशी प्राणी

283 प्रजातींचे 6611 वृक्ष-वनस्पती आहेत राणीबागेत.

291 दुर्मीळ व 15 औषधी वनस्पतींची झाडे आहेत.

7 पैकी सहा खंडांतील देशी-विदेशी झाडे येथे आहेत.

13 जातींचे 84 सस्तन प्राणी, 19 जातींचे 157 पक्षी.

7 जातींचे 32 उभयचर व सरपटणारे प्राणी.

9.30 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान तिकीट काढता येते.

भाऊ दाजी लाड संग्रहालय

राणीबागेच्या आवारातच भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय आहे. मुंबईचा इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून देणार्‍या या वस्तुसंग्रहालयाची दखल ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने घेतली आहे. मुंबईचा इतिहास, भूगोल, साहित्य, लोकजीवन, कलाकृती याची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी पाहता येते. घारापुरी लेण्यांमधला दगडी हत्ती व एक तोफ इथे आहे. राणीबागेला भेट देणारे पर्यटक या वस्तुसंग्रहालयाला आवर्जून भेट देतात.

कसे जाल?

लोकलने चर्चगेट स्टेशन अथवा छत्रपती शिवाजी महाराज सीएसएमटी स्टेशनवरून टॅक्सी अथवा बेस्ट बसने श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथे उतरून गेट वे ऑफ इंडियाला पोहोचता येते.

भायखळा रेल्वे स्टेशन येथे उतरून राणीबागेला भेट देता येते. भायखळा रेल्वे स्टेशनपासून राणीबाग अवघ्या 7 मिनिटांवर आहे. रस्त्याने येण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग जवळचा रस्ता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news