

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ही घोषणा केली. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी होणार आहे.
टोल माफीमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी ४५ आणि ७५ रुपये अशी आकारणी केली जात होती. २०२६ पर्यंत टोलची मुदत होती. भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता होती. सरकारच्या निर्णयामुळे २ लाख ८०००० वाहनांना दिलासा मिळेल. जो आर्थिक भार पडणार आहे याबाबत सरकारने निर्णय घे्ताना सर्व गोष्टी विचारात घेतल्या आहेत. याबाबत सरकार प्रतिपूर्ती करेल, असे मंत्री दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.