

प्रकाश साबळे
मुंबई : मुंबईतील झोपडपट्टयातील स्वच्छतेची कामे करणाऱ्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान ( वस्ती स्वच्छता योजना) नावाचे महापालिकेकडून "बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना" असे नामकरण करण्यात येणार आहे. तसेच कामगारांचे मासिक ६ हजार रूपये अनुदानावरून थेट ११ हजार रूपये करण्याचा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागाने तयार केला आहे. तो लवकरच स्थायी समिती सभेपुढे मांडण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील श्रमिक वर्गातील कामगारांना दिलासा मिळणार आहे.
मुंबई शहराची सुमारे ४५ टक्के लोकसंख्या झोपडपट्टी क्षेत्रांमध्ये वास्तव्याला आहे. या संपुर्ण क्षेत्रामधील घरांतील ओला- सुका कचरा संकलन करणे, वायवाटा स्वच्छ करणे, शौचालय व गटारांची साफसफाई करणे आदीं कामे करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याने सन २०१३ साली स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (वस्ती स्वच्छता योजना,एसएमपी) नावाची योजना सुरु केली होती. ती आजही झोपडपट्टीमध्ये यशस्वीपणे सुरु आहे.
या योजनेत काम करणाऱ्या कामगारांना स्वयंसेवक म्हणून ओळखले जाते. त्यांना गेल्या १० ते १२ वर्षांपासून तुटंपुज्या वेतनावर उदारनिर्वाह करावा लागतो. महानगरपालिकेकडून संस्थाचालकांना अर्थात कंत्राटदारांना प्रत्येक युनिट मासिक अनुदान ५४०० रूपये दिले जाते. यामुळे याचा स्वच्छतेच्या कामांच्या परिणाम होतो, हे आता पालिका प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यांचे ११ हजार रूपये मानधन करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
ही कामे करावी लागतात
झोपडपट्टयांतील चाळीमधील घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, वस्तीतील अंतर्गत पायवाटांवर झाडू मारणे, सार्वजनिक कचरा संकलन केंद्राची स्वच्छता राखणे, वस्तीतील रस्त्यांची स्वच्छता करणे, शौचालयाची साफसफाई करणे, अंतर्गत गटाराची स्वच्छता करणे तसेच स्वच्छतेबाबत प्रबोधन व जनजागृती करणे.
प्रस्तावित योजनेतील प्रमुख बदल :-
घटक एसएमपीए योजना सुधारित योजना
युनिट १५० कुटुंबे प्रति युनिट बदल नाही
मा.अनुदान ५४००रु. ११,०००रु.
लोकवर्गणी रहिवासी २० रू. रहिवासी ५० रु
दुकाने ५० रु. दुकाने १०० रु
कामांचे कचरा, नाले फक्त कचरा संकलन
स्वरूप शौचालय व स्वच्छता केंद्रित
नाले/ गटार कामे एसएमपीए स्वतंत्र मनुष्यबळ
शौचालय एसएमपीए सीबीओद्वारे
व्यवस्थापन
क्षेत्र विस्तार झोपडपट्टयापुरता एसआरए इमारती