

मुंबई : मुंबईत मे महिन्यामध्ये मान्सून दाखल झाला असला, तरी गेल्या दोन महिन्यांत अवघा 45 टक्के पाऊस झाला आहे. मुंबई शहरात सरासरी 2,095 मिमी, तर उपनगरात 2,319 मिमी पाऊस होतो. पण गेल्या दोन महिन्यांत अनुक्रमे 941 मिमी 1,273 मिमी पाऊस झाला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत पाऊस अपुरा असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
गतवर्षी 26 जुलैपर्यंत सुमारे 85 टक्केपेक्षा जास्त पाऊस पडला होता. मे महिन्यामध्ये सुरू झालेल्या पावसाची जून अखेरपर्यंत टक्केवारी सुमारे 23 टक्के इतकी होते. ठाणे व पालघर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावातील पाणीसाठा 12 लाख 85 हजार दशलक्ष लिटर्सवर पोहचला आहे.
शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणार्या भातसा तलावातील पाणीसाठाही 6 लाख 23 हजार दशलक्ष लिटर्स इतका झाला आहे. अन्य तलावातील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे.
अप्पर वैतरणा - 1,82,941
मोडकसागर - 1,28,925
तानसा - 1,43,416
मध्य वैतरणा - 1,82,044
भातसा - 6,23,819
विहार - 18,610
तुळशी - 5,663 (द. लि.)