Mumbai Student Protest Controversy: मुंबईत महिला आंदोलकांशी गैरवर्तन नाही; भाजपचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Mumbai Protest Viral Video
Mumbai Protest Viral VideoPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन झाल्याचा विरोधकांचा आरोप भाजपने फेटाळून लावला आहे. त्याचवेळी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. रोहित पवार यांनी राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरील एका व्हिडिओचा विपर्यास करून मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Mumbai Protest Viral Video
POP Ganesh Idol: सरसकट पीओपी बंदी तूर्तास शक्य नाही; राज्य सरकारची भूमिका

वस्तुस्थिती अशी दिसते की, संबंधित पोलीस अधिकारी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करताना दिसत नाहीत. ते निळ्या शर्टमधील व्यक्तीला पकडण्यासाठी धावत गेले होते. हे व्हिडिओच्या सुरूवातीपासून स्पष्ट दिसत असल्याचे बन यांनी व्हिडिओ समोर आणत म्हटले आहे.

Mumbai Protest Viral Video
Maharashtra CSR Fund: राज्यातील ५१% सीएसआर एकट्या मुंबईत खर्च

तसेच, रोहित पवारांनी राजकीय फायद्यासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी मुंबई पोलीसांना बदनाम करू नये. फक्त सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा तथ्यांची पडताळणी करूनच सार्वजनिक आरोप करायला हवेत. तुमचे हे राजकारण बघून जनतेच्या डोक्यात तिडीक येते हे लक्षात ठेवा, असा टोलाही लगावला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news