Mumbai crime : किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून मुंबईत पुन्हा चाकूहल्ल्याची घटना

Mumbai crime : किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून मुंबईत पुन्हा चाकूहल्ल्याची घटना
Published on
Updated on

मुंबई : येथील माहीम परिसरात किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून एका 35 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. 25 जून रोजी रात्री सुमारे 10 वाजता माहीम रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली.

लोअर परेल येथील खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करणारे नवीन प्रसन्न हे कामावरून घरी परतत असताना स्टेशन परिसरात एका अनोळखी व्यक्तीला चुकून धक्का लागला. धक्क्यामुळे त्या व्यक्तीचा मोबाईल खाली पडला, मात्र मोबाईल सुरक्षित असल्याचे पाहूनही आरोपीने नवीन यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

Mumbai crime : किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून मुंबईत पुन्हा चाकूहल्ल्याची घटना
Mumbai Local Train Murder : बोरीवली लोकलमधील चाकूहल्ला प्रकरणातील आरोपी अटकेत; कुर्ल्यातून रोशन सुवर्णला बेड्या

वाद टाळण्यासाठी नवीन तेथून निघून गेले, परंतु आरोपीने त्यांचा पाठलाग करत सेनापती बापट मार्गावर त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतरही आरोपीने चाकूचा धाक दाखवत नागरिकांना दूर ठेवले आणि घटनास्थळावरून फरार झाला.

Mumbai crime : किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून मुंबईत पुन्हा चाकूहल्ल्याची घटना
Munna Jhingada: मुंबईचा कुख्यात गुंड ते ISI चा दहशतवादी? मुन्ना झिंगाडाचा गुन्हेगारी विश्वातील प्रदीर्घ प्रवास

जखमी अवस्थेत नवीन घरी पोहोचले. त्यानंतर त्यांच्या भावाने त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. मुंबई लोकलमधील अलीकडील हत्याकांडानंतर पुन्हा घडलेल्या या चाकूहल्ल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news