

Sadavarte Shinde group political dispute
मुंबई : एसटी को-ऑपरेटिव बँकेच्या आज (दि. १५) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मोठा राडा झाल्याचा प्रकार घडला. सदावर्ते गट आणि शिंदे गट आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी झालेल्या हाणामारीत शिंदे गटाचे पाच जण जखमी झाले. यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
शिंदे गटाकडून सदावर्ते गटावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले शिवाय या बैठकीवर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि त्यानंतर शिंदे गटाकडून याचे व्हिडिओ करण्यात येत होते आणि त्यामुळे वाद वाढत गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
संचालक मंडळामध्ये 19 संचालक आहेत. त्यातील 10 सभासद सदावर्ते गटाचे आहेत. तर नऊ सभासद हे शिंदे गटाचे आहेत. एसटी बँक संचालक मंडळावर अडसूळ गटाचे संचालक या बैठकीत होते. त्यांनी बैठकीत नेमकं काय झालं हे सांगितले. या सगळ्या प्रकरणी शिंदे गटाचे पाच जण जखमी झाले असून या सगळ्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे पदाधिकारी नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत.