मुंबई सिनेट निवडणूक | आरक्षण प्रवर्गातील 5 जागांवर युवासेना विजयी

Mumbai Senate Election | खुल्या प्रवर्गातील मतमोजणीला प्रारंभ
Mumbai Senate Election
मुंबई सिनेट निवडणूक | आरक्षण प्रवर्गातील 5 जागांवर युवासेना विजयीFile Photo
Published on
Updated on

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर (अधिसभा) नोंदणीकृत पदवीधरांमधून दहा जागांपैकी आरक्षण प्रवर्गातील पाच जागावर युवासेनेने बाजी मारली आहे. यानंतर आता खुल्या प्रवर्गातील मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

विविध कारणाने तब्बल दोन ते अडीच वर्ष रखडलेली दहा पदवीधर मतदारसंघातील दहा सदस्य निवडीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. यानंतर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ सभागृहात सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या टप्यात आरक्षण प्रवर्गातील गटातील मतमोजणी करण्यात आली. यावेळी युवासेनेच्या पाच उमेदवारांनी बाजी मारली आहे. मयुर पांचाळ (ओबीसी), स्नेहा गवळी (महिला प्रवर्ग) शितल शेठ (अनुसुचित जाती), डॉ. धनराज कोहचाडे (अनुसूचित जमाती), शशिकांत झोरे (विज-भज) हे उमेदवार विजयी झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news