मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत मे महिन्यात दाखल झालेल्या मान्सूननंतर गेल्या जवळपास सव्वा दोन महिन्यांत मुंबईत 50 टक्केही पाऊस झाला नाही. 4 ऑगस्टपर्यंत 47 टक्के इतकाच पाऊस झाला. यात शहर विभागात अवघा 43 टक्के इतका पाऊस झाला असून हा मागील वर्षापेक्षा 30 ते 35 टक्केपेक्षा कमी आहे.
अपवाद वगळता जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांत मुंबईत सरासरीच्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस होतो. मात्र या जुलै महिन्यामध्ये जेमतेम 22 टक्के पाऊस झाला. पर्जन्यमापक यंत्राच्या नोंदीनुसार आतापर्यंत 43 टक्के पाऊस झाला असून उपनगरांत 48 टक्के पाऊस झाला आहे.
पाऊस 2004 च्या जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांत झाला होता. मुंबईमध्ये 26 जुलै 2005 मध्ये एकाच दिवसात सर्वाधिक 944 मिमी पावसाची नोंद झाली होती, तर मुंबई शहर व उपनगरांत 2007 मध्ये जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत 47 टक्के पाऊस पडला होता.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जेमतेम वार्षिक सरासरी इतका मुंबईत पाऊस होईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्यामुळे पाऊस गणेश उत्सव गाजवणार आहे.