Mumbai rainfall : मुंबईत सरासरीच्या 15 टक्के अधिक पाऊस

आतापर्यंत शहरात 107 टक्के तर उपनगरात 133 टक्के पावसाची नोंद
Mumbai rainfall
मुंबईत सरासरीच्या 15 टक्के अधिक पाऊस pudhari photo
Published on
Updated on

मुंबई :मे महिन्यात दाखल झालेल्या पावसाने स्पटेंबर महिना संपला तरी परतीचे नाव घेतले नाही. दिर्घकाळ बरसात झाल्याने पावसाने यावर्षी सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत शहरात 107 टक्के तर उपनगरात 133 टक्के पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या 15 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे.

मे महिन्यातच मान्सून दाखल झाला. मात्र जुलै, ऑगस्टमध्ये मुंबईकरांना मुसळधारांचा अनुभव घेतला. महिनाभरापूर्वीच उपनगरांतील पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली होती. शहर विभागात 5 सप्टेंबरपर्यंत अवघा 79 टक्के पाऊस झाला होता. तर उपनगरात 108 पाऊस झाला होता. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस पडला.

Mumbai rainfall
BMC election 2025 : आठवडाभरात अंतिम प्रभाग रचना

यात उपनगरापेक्षा शहरात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे शहर विभागातही पावसाने शतक पूर्ण करत वार्षिक सरासरी पावसापेक्षा 7 टक्के जास्त पाऊस बरसला. आतापर्यंत शहरात 107 टक्के तर उपनगरात 133 टक्के पावसाची नोंद करण्यात आली. 2024 च्या तुलनेत हा पाऊस सुमारे 15 टक्केने जास्त आहे.

वेधशाळेची नोंद (29 सप्टेंबर)

  • शहर ः 2,245.2 मिमी (वार्षिक सरासरी 2095 मिमी)

  • उपनगर ः 3,100.4 मिमी (वार्षिक सरासरी 2095 मिमी)

पालिकेची नोंद (29 सप्टेंबर)

  • शहर - 2241.54 मिमी

  • पूर्व उपनगर - 2690.67 मिमी

  • पश्चिम उपनगर - 2711.10 मिमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news