

मुंबई : पावसाने ब्रेक घेतल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कमाल तापमान 30 अंशांवर गेले असून हवेतील आर्द्रतेचे प्रमाण नव्वदीपार गेले आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला मुसळधार पावसाने बुधवारी उघडीप दिली. तुरळक पाऊस वगळता दिवस कोरडा गेला. सांताक्रुझ वेधशाळेत बुधवारी किमान 24 आणि कमाल 30 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. गुरुवारी (25/29 अंश सेल्सिअस) किमान तापमानात वाढ आणि कमाल तापमानात घट होऊ शकते.
शुक्रवारी कमाल तापमान तिशीखालीच राहण्याची शक्यता आहे. मात्र, वीकेंडला त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.पाऊस कमी झाल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. दुपारी प्रचंड उष्मा जाणवत आहे. बुधवारी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 91 टक्के इतके होते.