Mumbai rain viral video : महापालिका कर्मचार्‍याकडून मॅनहोलवर पहारा

पालिकेच्या कर्मचार्‍याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Mumbai rain viral video
महापालिका कर्मचार्‍याकडून मॅनहोलवर पहाराpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबईत रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळल्याने सोमवारी शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. दक्षिण मुंबईतील पाणी तुंबण्याचे हॉटस्पॉट असलेल्या हिंदमाता, किंग्ज सर्कल, माटुंगा, फाईव्ह गार्डन आणि हिंदू कॉलनी परिसरात पाण्याचा निचरा न झाल्याने मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते.

पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते. मात्र तरीही पाण्याचा निचरा होण्यास अचडणी येत असल्यामुळे पालिकेचा एक कर्मचारी रस्त्यावरील मॅनहोल उघडून पाण्याचा निचरा करण्यासाठी मॅनहोलजवळ बसल्याचे दिसून आले.

मुसळधार पावसात जीव धोक्यात घालुन मुंबईकरांच्या सुरक्षेकरता मॅनहोलभोवती पहारा देणार्‍या पालिकेच्या कर्मचार्‍याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमध्ये अनवधानाने पडून अनेक जीवघेणे अपघात होतात. त्यामुळे नागरिकांना सावध करण्यासाठी पालिका कर्मचार्‍याने मॅनहोलच्या झाकणावरच बसून पहारा दिला.

Mumbai rain viral video
E-bike taxi : आजपासून धावणार ई-बाईक टॅक्सी

एकीकडे सोशल मिडीयावर या कर्मचार्‍याचे कौतूक होत आहे. तर दुसरीकडे या घटनेमुळे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकिक मिरवणार्‍या मुंबईच्या नावाला बट्टा लागल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news