Mumbai Pune expressway traffic jam : मुंबई - पुणे महामार्गावर वाहनकोंडी

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे दोन तास कोंडीत अडकल्या
Mumbai Pune expressway traffic jam
मुंबई - पुणे महामार्गावर वाहनकोंडीpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मिसिंग लिंकचे उदघाट्न आणि विकेंड साजरा करण्यासाठी शहराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांच्या वाहनामुळे शुक्रवारी मुंबई - पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकजण सुमारे दोन तास वाहतूक कोंडीत अडकले होते.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या क्षमतावाढीचा एक भाग म्हणून मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याच वेळी मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या वाहिनीवर पहाटेपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. काही वाहनचालक दोन-दोन तास खंडाळा घाटात अडकून पडले होते.

Mumbai Pune expressway traffic jam
Middle East War: मध्यपूर्वेत युद्धाची धग : हजारो भारतीय आखातात अडकले, 350 हून अधिक उड्डाणे रद्द

मुंबई - पुणे महामार्गावर मानखुर्द येथे क्रेन उलटल्यामुळे बुधवार आणि गुरुवारी वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना आज तिसऱ्या दिवशीही वाहनांच्या रांगेत तळतळणे भाग पडले. या मार्गांवरील चेंबूर ते मानखुर्द हे पंधरा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी पाच ते सहा तास लागत होते.

शुक्रवारी महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमालाही हजर राहण्यासाठी निघालेल्या सुळे तिकडे पोहचू शकल्या नाहीत. एका व्हिडिओद्वारे त्यांनी आपली व्यथा कथन केली. सुप्रिया सुळे आपल्या व्हिडिओत म्हणतात, मी सकाळी 7 वाजता ठाण्याहून निघाले होते. पण गेले दोन तास आम्ही सगळे वाहतूक कोंडीत अडकलो आहोत. आता दोन तास गाडीत बसून आमची आजुबाजूच्या लोकांसोबत मैत्रीही झाली आहे. तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता आम्ही सर्वजण वाहतूक कोंडीत अडकलो आहोत.

Mumbai Pune expressway traffic jam
Nitin Gadkari : कागलमध्ये 358 कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर

सुळे यांच्या बाजूला असलेल्या कारमधील प्रवाशांनीही व्हिडिओत आपल्या भावना व्यक्त केल्या. सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सएप स्टेटसवरही या वाहतूक कोंडीचे स्टेटस ठेवले आहे. त्यांनी या वाहतूक कोंडीचे फोटो व व्हिडिओ आपल्या स्टेटसवर शेअर करत मुंबई - पुणे रोड असे ठिकाण लिहून हात जोडल्याचा इमोजी वापरला आहे. याद्वारे त्यांनी एकप्रकारे हतबलता व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दिलगिरी

यावेळी मुख्यमंत्र्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुंबई पुणे महामार्गावरील वाहतुककोंडी संदर्भातील व्हिडिओचा संदर्भ देत त्यांची दिलगिरी व्यक्त केली. “सुप्रिया ताई, तुम्ही आज शेवटच्या वाहतूक कोंडीत अडकलात, आता मिसिंग लिंक सुरू झाल्यामुळे यापुढे तुम्हाला किंवा इतर कोणत्याही प्रवाशाला घाटात ट्रॅफिकमध्ये अडकण्याची वेळ येणार नाही,“ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news