Mumbai Pune Expressway traffic: एक्स्प्रेस वेवर पुन्हा दोन तास कोंडी; खालापूर टोलनाक्यापासून बोरघाटापर्यंत 12 किमी रांगा, वाहतूक नियोजनावर संताप

एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्यापासून वाहनांच्या लांबच लांब रांगा
Mumbai Pune Expressway traffic
Mumbai Pune Expressway trafficPudhari
Published on
Updated on

खोपोली : प्रशांत गोपाळे

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गेल्या दोनच दिवसांपूर्वी तब्बल 31 तासांची भीषण वाहतूक कोंडी झाल्यानंतर, वाहतूक आता सुरळीत सुरु राहील असा विश्वास महामार्ग वाहतूक पोलीस देत असतानाच आज (शुक्रवार) पून्हा एकदा वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने दोन तासांच्या या वाहतूक कोंडीने वाहन चालक व प्रवासी पून्हा हैराण झाल होते. त्यामुळे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक नियंत्रणाच्या गलथान कारभाराबाबत सर्वांनीच संताप व्यक्त केला.

Mumbai Pune Expressway traffic
Mumbai Municipal Corporation Hall: मुंबई महापालिका सभागृह अपुरे! 237 नगरसेवक, बसायचे कुठे?

शनिवार-रविवारच्या सुट्ट्यामुळे वाहनांची संख्या मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आज वाढली.त्यामुळे महामार्ग वाहतूक पोलीसांनी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई लेनवर ब्लॉक घेतला आहे.

Mumbai Pune Expressway traffic
Panvel Mayor Election: पनवेल पालिकेवर भाजपची पाटीलकी; आगरी समाजाला संधी, महापौरपदी नितीन पाटील, तर उपमहापौरसाठी प्रमिला पाटील यांना उमेदवारी

पुण्याकडील वाहतूक मुंबई लेनवरुन वळवून वाहनांची गर्दी कमी केली जात आहे. तर एक्स्प्रेस वेवर झालेली वाहतुक कोंडी लक्षात घेऊन आता अवजड वाहने रोखण्याचे काम पोलीसांनी सुरू केले आहे. पुण्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहने बाजूला थांबविण्यात आल्याने घाट परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत झाली.

Mumbai Pune Expressway traffic
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दिलासा! ई-केवायसी दुरुस्तीसाठी पोर्टल पुन्हा सुरू, 31 मार्चपर्यंत संधी

10 ते 12 किमी रांगा

प्रोपेलीन गॅस टँकर अपघातामुळे विस्कळीत झालेली मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक 5 फेब्रुवारी रोजी गुरुवारी सुरळीत झाली. त्यामुळे शुक्रवारी पहाटेपासून मुंबईत अडकून पडलेले प्रवासी व अन्य वाहने मोठ्या संख्येनी पुण्याच्या दिशेने निघाले, त्यामुळे पुणे लेनवर खालापूर टोल नाक्यापासून बोरघाटातील अमृतांजन ब्रीजपर्यंतच्या परीसरात वाहनांच्या 10 ते 12 किमी अंतराच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी व वाहन चालक हैराण झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news