Mumbai Pune Expressway landslide : मिसिंग लिंकच्या पुणे-मुंबई वाहिनीवरील दोन मार्गिका अद्याप बंद

दरड कोसळलेल्या भागात अद्याप पाणी पडत असल्याने चारपैकी केवळ दोनच मार्गिकांवरून वाहतूक सुरू आहे.
Mumbai Pune Expressway landslide
मिसिंग लिंकच्या पुणे-मुंबई वाहिनीवरील दोन मार्गिका अद्याप बंदpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर सोमवारी दरड कोसळल्यानंतर हा मार्ग दिवसभर बंद होता. सोमवारी रात्री १०.१० वाजता दोन्ही दिशांची वाहतूक सुरू झाली असली तरी पुण्याहून मुंबईला येणाऱ्या वाहिनीवरील दोन मार्गिका अद्याप बंदच आहेत.

सोमवारी पहाटे ४ वाजता पुण्याहून मुंबईला येणाऱ्या मार्गिकेवरच दरड कोसळली आणि मिसिंग लिंकच्या बोगद्याची कमान ढासळून रस्त्यावर पडली. परिणामी, हा महामार्ग पूर्णपणे बंद झाला होता. दरड कोसळलेल्या भागात अद्याप पाणी पडत असल्याने चारपैकी केवळ दोनच मार्गिकांवरून वाहतूक सुरू आहे. वाहतूक सुरू करण्यापूर्वी या रस्त्याचे तांत्रिक व सुरक्षाविषयक परीक्षण करण्यात आले आहे.

Mumbai Pune Expressway landslide
Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत; मिसिंग लिंक पुन्हा सुरु

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एकूण सुमारे १०० टन मातीचा ढिगारा रस्त्यावर आला होता. यापैकी सुमारे ७० टन ढिगारा युद्धपातळीवर बाजूला केला, तर उर्वरित ढिगारा नंतर पुढील दोन तासांत बाजूला करण्यात आला. सध्या वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर ३ लेन, तर पुण्याकडून मुंबईकडे जायासाठी टोन लेन सुरु करायात आल्या आहेत.

वाहतूक मंदावली

मिसिंग लिंकच्या पुलावर ताशी ८० किमी आणि बोगद्यात ताशी १०० किमी वेगमर्यादा होती. सध्या पुलावर ताशी ४० किमी आणि बोगद्यात ताशी ६० किमी वेगाची मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळे महामार्ग सुरू झाला असला तरी वाहतूक मंदावली आहे.

Mumbai Pune Expressway landslide
Lonavala Landslide: लोणावळ्यात दरडीचा थरार; पाटण गावात घरावर दरड कोसळली, तिघे अडकल्याची भीती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news