मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

Published on

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला 'शिवसेना' नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. रविवारी (दि.१९) शिवसेना भवना बाहेर रास्ता रोको करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मोठे आंदोलन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर आज कल्याणमध्ये देखील ठाकरे गट आक्रमक झाले असून आज कल्याण पूर्व येथील शिवसेना शाखेबाहेर कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या निषेधाचे बॅनर झळकावले. केंद्रीय निवडणूक आयोग व सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. मात्र, या मोर्चा दरम्यान प्रमुख मोठे नेते नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news