Coaching classes inspection : मुंबईतील खासगी कोचिंग क्लासेसची होणार तपासणी

विधान परिषदेच्या सभापतींचे समिती स्थापन करण्याचे निर्देश
Coaching classes inspection
मुंबईतील खासगी कोचिंग क्लासेसची होणार तपासणीfile photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई शहरात जागोजागी सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासेसची गंभीर दखल घेण्यात आली आहे. कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने संबधित अधिकाऱ्यांची समिती गठित करावी आणि या समितीने 15 दिवसांत अहवाल सादर करावा असे, निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता खासगी क्लासेसकडून विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाणे, मुंबईतील खासगी क्लासेसच्या यासंदर्भात पावसाळी अधिवेशनामध्ये विधानपरिषद सदस्य राजेश राठोड यांनी लक्षवेधी सुचना मांडली होती. त्यासंदर्भात सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात नुकतीच बैठक झाली.

Coaching classes inspection
Jio Google AI Pro: जिओ ग्राहकांना 18 महिन्यांपर्यंत मिळणार गुगल एआय प्रोचा मोफत ॲक्सेस

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात तसेच राज्यात अनेक खासगी कोचिंग क्लास सुरू आहेत. क्लास सुरू असलेली जागा, क्लासच्या ठिकाणी अग्निसुरक्षा, पार्किंग याबाबतची व्यवस्था, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून मोठे शुल्क आकारुन कमी रक्कम दाखविणे आणि यात कर चोरी करणे, निवासी संकुल परवानगी असलेल्या इमारतीत खासगी क्लास सुरु करणे आणि अनधिकृत बांधकाम याबाबतची सर्व तपासणी करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही संबधित विभागाने तपासणी करावी, असे निर्देश सभापती शिंदे यांनी दिले.

या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार राजेश राठोड, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह शिक्षण विभाग आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Coaching classes inspection
Raj Thackeray on EVM | ईव्हीएम आणि मतदार याद्यातील गोंधळ म्हणजे मॅच फिक्सिंग - राज ठाकरे

खासगी क्लासेसबाबत विधेयक आणणार

  • राज्यातील खासगी कोचिंग क्लास संदर्भात विधेयकाचे प्रारूप तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. हे विधेयक व संबंधित कायदा परिपूर्ण व्हावा या दृष्टीने जनतेकडूनही सूचना मागविण्यात याव्यात, तसेच खासगी क्लास संदर्भात सर्व समावेश असे विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जावे, असे निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news