Mumbai drone ban : मुंबईत ड्रोन, पॅराग्लायडरच्या उड्डाणावर ३० दिवस बंदी

१४ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून १२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार
Mumbai drone ban
Mumbai drone ban pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : दहशतवादी अथवा राष्ट्रविरोधी घटकांकडून ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आदींचा वापर करून हल्ला करण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी महत्त्वाचा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध प्रकारच्या मानवरहित किंवा हलक्या हवाई उपकरणांच्या उड्डाणावर ३० दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

Mumbai drone ban
Maharashtra CM Srushti Yojana : राज्यात सीएम सृष्टी योजना, मुख्यमंत्री शौर्य पदकाने होणार पोलिसांचा गौरव

पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी अकबर पठाण यांनी हा आदेश ६ ऑक्टोबर रोजी जारी केला. त्यानुसार १४ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून १२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

या कालावधीत ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा-मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स आणि हॉट एअर बलून यांच्या उड्डाणास मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मनाई करण्यात आली आहे. या माध्यमातून व्हीव्हीआयपींना लक्ष्य करणे, मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जीवन धोक्यात आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांच्या कारवाईला अपवाद

मुंबई पोलिसांकडून हवाई पाळत ठेवण्यासाठी करण्यात येणारी कारवाई या निर्बंधातून वगळण्यात आली आहे. उपआयुक्त (अभियान) यांची लेखी परवानगी घेतल्यानंतर संबंधित हवाई उपकरणांच्या वापरास परवानगी मिळू शकते.

Mumbai drone ban
Chhatrapati Sambhajinagar | वायरमनला मारहाण, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

उल्लंघन केल्यास होणार गुन्हा दाखल

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. सर्व संबंधितांना वैयक्तिक नोटीस देणे शक्य नसल्याने हा आदेश एकतर्फी जारी करण्यात आला आहे.

यावर निर्बंध?

ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर,पॅरा-मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news