Mumbai school holiday : आजही शाळा महाविद्यालयांना सुट्टी

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन
Mumbai school holiday
आजही शाळा महाविद्यालयांना सुट्टी AI Image
Published on
Updated on

मुंबई : भारतीय हवामान विभागाने मुंबईमध्ये मंगळवार ७ जुलैला २ मुसळधार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) तर सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांना मंगळवार ७ जुलैला सुटी जाहीर करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘मिसिंग लिंक’वर दरड कोसळली : मुंबई-पुणे एक्‍स्‍प्रेस वे १० तास ठप्‍प

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर मिसिंग लिंक आणि तळेगाव उर्से टोलनाका येथे दरड कोसळल्याने एक्सप्रेस वे जवळजवळ १० तास पूर्ण बंद झाला. त्‍यामुळे महामार्गावर २५ किमी लांब वाहनांच्‍या रांगा लागल्‍या होत्‍या. १० तासांनंतर एक लेन सुरु करण्यात आली. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली. रात्री दहा वाजता हा मार्ग पूर्ण सुरू झाला.

Mumbai school holiday
Mumbai-Pune Train: मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग ठप्प! कर्जत–लोणावळा घाटात दरड कोसळली; कोणत्या गाड्या रद्द?

मुसळधार पावसाचा मोठा फटका रेल्वेला बसला. कर्जत-लोणावळा घाटा ठाकूरवाडी आणि मंकी हिलदरम्यान दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. आतापर्यंत १६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर ६ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. महामुंबईत रविवार आणि सोमवार हा अतिवृष्टीचा दिवस ठरला असून, जवळ जवळ २ दिवसांत ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्घटना घडल्या आहेत.

जगातील सर्वात रुंद बोगदा आणि देशातील सर्वात उंच केबलस्टेड पूल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा सहयोगातून बांधण्यात आलेला मिसिंग लिंक मार्ग कोणत्याही नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला होता. १ मे रोजी या प्रकल्पाचे उद्‌घा‌टन झाले होते. मात्र पहिल्याच पावसात राज्य रस्ते विकास महामंडळाचा आणि राज्य सरकारच्या सर्व दाव्यांची पोलखोल झाली आहे.

Mumbai school holiday
Mumbai Rain Update: राज्यात पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्ग बंद, मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; नद्या धोक्याच्या पातळीवर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news