चक्क स्थायी समिती सभागृहातच चोरी

Mumbai theft news | २० हजार रुपये चोरल्याचा ठाकरे गटाच्या नगरसेविकेचा आरोप
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समिती सभागृहात पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पैशांची चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांनी आपल्या पर्समधून २० हजार रुपये चोरी गेल्याचा आरोप केला आहे.

स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवार दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली होती. सभा संपल्यानंतर पार्श्वगायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली जात असताना, शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका समिती सदस्या लक्ष्मी भाटिया दाखल झाल्या. उशिराने सभागृहात झालेल्या भाटिया थोडावेळ सभागृहात बसल्यानंतर काही वेळात बैठक संपली. त्यामुळे सर्व सदस्य जेवण करण्यासाठी सभागृहाला लागून असलेल्या दालनात गेले. त्यांच्यासोबत भाटियाही आपली पर्स सभेच्या टेबलावर ठेऊन जेवणासाठी गेल्या. जेवण झाल्यानंतर त्या परत सभागृहात आल्या. यावेळी त्यांच्या पर्सची चैन उघडी असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी पर्समधील वस्तूंची तपासणी केली असता, २० हजार रुपये नसल्याचे दिसून आले.

आपले पैसे चोरीला गेल्याची तक्रार घेऊन भाटिया स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे गेल्या यावेळी शिंदे यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. शिंदे यांनी भाटिया यांचे म्हणणे ऐकून घेऊन, सचिव विभागाला चाकशीचे निर्देश दिले. दरम्यान आपले पैसे सभागृहात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी चोरल्याचा आरोप केला. या आरोपामुळे गेल्या कित्येक वर्षापासून स्थायी समितीचे कामकाज सांभाळणाऱ्या सचिव विभागातील कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news