नवी मुंबई शाहबाज गावात तीन मजली इमारत कोसळली Pudhari
मुंबई
Navi Mumbai News : कोसळलेल्या इमारतीतून ५० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले
नवी मुंबई शाहबाज गावात तीन मजली इमारत कोसळली
नवी मुंबई : नवी मुंबईत, बेलापूर शहाबाज गाव सेक्टर १९ हनुमान मंदिर जवळ आज शनिवारी पहाटे ५ वाजून २० मिनिटांच्या सुमारास G+3 इमारत पडली. या इमारतीच्या ढिगाऱ्यामध्ये दोन माणसे अडकली होती. त्यांना काढण्यासाठी घटनास्थळी सीबीडी फायर ब्रिगेड तसेच वॉर्ड ऑफिसमधील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दोन्ही व्यक्तींना रेस्क्यू करण्यात आले आहे. तरी अजून कोणी अडकलेले की नाही, याची खात्री घेण्यात येत आहे.
दोघांना सुखरु बाहेर काढण्यात आले आहे तर एकाचा शोध सुरु आहे. एनडीआरएफ पथकाकडून मदतकार्य सुरु आहे. NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे, तेथील स्थानिक आणि नागरिकांचे माहितीनुसार, अजून एक जण आतमध्ये अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून घटनास्थळी शोध कार्य चालू आहे.
