Mumbai News | पालिकेच्या २७ रुग्णालयांचा औषध पुरवठा बंद

लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय पुरवठा न करण्यावर पुरवठादार ठाम
Mumbai Municipal Corporation
मुंबई महापालिकाfile photo
Published on
Updated on

मुंबई : कोरोनानंतर पालिका रुग्णालयांना औषधे पुरवठा करणाऱ्या १५० पुरवठादारांची प्रलंबित बिले महापालिकेने दिली नसल्याने पालिकेच्या २७ रुग्णालयांना करण्यात येणारा औषधांचा पुरवठा सोमवारपासून बंद केला आहे. तसेच प्रशासनाकडून बिले मंजूर करण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

महापालिकेतील वैद्यकीय महाविद्यालये व उपनगरीय रुग्णालयांना औषध पुरवठा करण्यासाठी विविध माध्यमांतून खरेदी करण्यात येणाऱ्या औषधांची जवळपास १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त बिले प्रलंबित आहेत. परिणामी अनेक वितरकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, तसेच नव्याने औषधे खरेदी करणेही मुश्किल झाले असून, या वितरकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. बिले मंजूर करण्यासंदर्भात वेळोवेळी पालिकेकडे वितरकांकडून पाठपुरावा करूनही देयके मंजूर न झाल्याने अखेर सोमवारपासून औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय १५० वितरकांनी घेतला. सोमवारी मुंबई महपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी तातडीने बिले मंजूर करून आठवडाभरामध्ये देयकांचे पैसे वितरकांना मिळतील, असे आश्वासन दिले. मात्र प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे ऑल फूड अॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news