

मुंबई : मुंबई महानगरपालिका कर्मचार्यांच्या सानुग्रह अनुदानचा (बोनस) निर्णय येत्या आठवड्याभरात घेतला जाणार असून यावेळी 31 ते 32 हजार रुपये बोनस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कामगार संघटनांनी 20 टक्के बोनसची मागणी केली असली तरी मुंबई महापालिका प्रशासन गेल्या वर्षी इतकाच म्हणजे 29 हजार रुपये बोनस देण्यास तयार आहे. परंतु हा बोनस वाढवून मिळावा यासाठी कामगार संघटनांनी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे बोनस संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने निर्णय होण्याची शक्यता आहे. यावेळी गेल्या वर्षीपेक्षा दोन ते तीन हजार रुपये बोनसमध्ये वाढवण्याची शक्यता आहे.
बेस्ट कर्मचार्यांनाही गेल्या वर्षीच्या धर्तीवर मुंबई महापालिका कर्मचार्यांप्रमाणे बोनस देण्याची मागणी कामगार संघटनेने केली आहे. यासाठी मुंबई महापालिका अर्थसहाय्य करणार आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचार्यांना ही 31 ते 32 हजार रुपये बोनस मिळेल, असे बोलले जात आहे.