मुंबई पालिकेत मोठा फेरबदल; १६ अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या

BMC News | सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या; पदोन्नती, नियुक्त्यांसह उपप्रमुख अभियंत्यांनाही संधी
BMC News
मुंबई महापालिकाPudhari Image
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई महापालिकेतील रखडलेले प्रशासकीय फेरबदल अखेर पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शुक्रवारी केले. त्यांनी एकाच वेळी १६ अधिकाऱ्यांच्या सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती, बदल्या आणि पदोन्नतीसह उपप्रमुख अभियंता संर्वगातील अभियंत्यांच्या सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्त्‌या केल्या.

१२ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या, पदस्थापना आणि ४ सहाय्यक आयुक्तांची उपायुक्त पदावर पदोन्नती करण्यात आली. तसेच एमपीएससीतून आलेल्या ४ उमेदवारांचीदेखील सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली.

सार्वजनिक आरोग्य विभागातील उपायुक्त संजय कुराडे यांची बदली परिमंडळ ७ मध्ये करण्यात आली. परिमंडळ ७ मधील उपायुक्त भाग्यश्री कापसे यांची परिमंडळ ४ मध्ये, तर परिमंडळ ४ मधील उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्याकडे करनिर्धारण व संकलन विभागाचा पदभार देण्यात आला.

पूर्णकालीन तत्वावरील संहाय्यक आयुक्त

• महापालिकेत सहाय्यक आयुक्तांची कमतरता भरून काढण्यासाठी तत्कालीन पालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंग चहल यांनी उपप्रमुख अभियंता आणि कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त पदासाठी मुलाखती घेतल्या होत्या. आता या पदावरील अभियंत्यांनाही सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे. यामध्ये पुढील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

• संजय इंगळे यांची सहाय्यक आयुक्त सी विभाग

• शंकर भोसले यांची सहाय्यक आयुक्त एम. पश्चिम

• नवनाथ घाडगे यांना सहाय्यक आयुक्त के. पूर्व विभागात नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले

एमपीएससीकडील उर्वरित सहाय्यक आयुक्त

• दिनेश पल्लेवाड एच. पश्चिम विभाग

• योगीता कोल्हे टी विभाग

• उज्वला इंगोले एम. पूर्व विभाग

• अरूण क्षीरसागर एफ. उत्तर विभाग

या सहाय्यक आयुक्तांची पदोन्नती

• जी. उत्तर विभागातील सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांची उपायुक्त पदावर पदोन्नती करून उद्याने विभागाचा पदभार..

• डी विभागातील सहाय्यक आयुक्त यांची पदोन्नतीने हंगामी उपायुक्त म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागात वर्णी.

• एम. पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा परिमंडळ - ३ चे प्रभारी उपायुक्त विश्वास मोटे यांची हंगामी उपायुक्त परिमंडळ तीनमध्ये नियुक्ती.

या सहा आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

• एच. पश्चिम विभागाचे विनायक विसपुते यांची जी. उत्तर विभागात बदली

• के. पूर्वचे मनीष वळंजू यांची डी विभागात पदस्थापना

• एम. पूर्व विभागाच्या अलका ससाणे यांची एस विभागात वर्षों

• एफ. उत्तर विभागातील नितीन शुक्ला यांची बी वॉर्डात बदली

• टी विभागातील (प्रभारी) अजय पाटणे यांची पी. दक्षिण विभागात (कार्यभार) म्हणून नियुक्ती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news