Metro network issue Mumbai : भुयारी मेट्रोत आरे-बीकेसी इंटरनेट सेवाही अखेर बंद

इंटरनेटसाठी यंत्रणा पुरवण्याचे कंत्राट रद्द
Metro network issue Mumbai
भुयारी मेट्रोत आरे-बीकेसी इंटरनेट सेवाही अखेर बंद pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : भुयारी मेट्रोच्या दक्षिण मुंबईतील स्थानकांत इंटरनेट सेवा अद्याप मिळू शकलेली नाही; दुसऱ्या बाजूला आरे ते बीकेसीपर्यंत पूर्वी उपलब्ध असलेली इंटरनेट सेवाही आता बंद झाली आहे. इंटरनेटसाठी यंत्रणा उभी करणाऱ्या कंत्राटदाराने कंत्राटातील अटी व शर्थींचे उल्लंघन केल्यामुळे एमएमआरसीएलने हे कंत्राट रद्द केले आहे.

आरे ते कफ परेड ही मेट्रो 3 भुयारी मार्गिका 33.5 किमीची आहे. ऑक्टोबर 2024मध्ये आरे ते बीकेसी हा टप्पा सुरू करण्यात आला. त्यानंतर मे 2025मध्ये बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा टप्पा सुरू करण्यात आला. सर्व भुयारी मार्गिकांमध्ये इंटरनेट सेवा देण्यात आली होती; मात्र ऑक्टोबर 2025मध्ये सुरू करण्यात आलेल्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या अखेरच्या टप्प्यात इंटरनेट सेवा अद्याप सुरू होऊ शकलेली नाही.

Metro network issue Mumbai
Mumbai civic hall : टाऊन हॉलचा प्रस्ताव रद्द होण्याची शक्यता

यंत्रणा उभारणारी कंपनी कंत्राटातील अटी व शर्ती पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचे कारण सांगून एमएमआरसीएलने त्यांचे कंत्राट रद्द केले आहे. यामुळे सर्वच कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद झाली आहे. ही यंत्रणा नव्याने उभारण्यासाठी पुन्हा निविदा काढली जाणार आहे. दरम्यान आपत्कालीन स्थितीत आवश्यक असणारी संपर्क यंत्रणा भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये उपलब्ध असल्याचे एमएमआरसीएलकडून सांगण्यात आले.

आरे ते वरळी या पहिल्या टप्प्यातील स्थानकांवर एअरटेल, वोडाफोन आणि जिओचे नेटवर्क उपलब्ध होते. मात्र नेटवर्कची यंत्रणा उभारणाऱ्या कंपनीकडून जास्त शुल्काची आकारणी केली जात असल्याचे कारण सांगून या कंपन्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर काही कंपन्यांची सेवा पुन्हा सुरू करण्यात एमएमआरसीएलला यश आले होते; मात्र यंत्रणा उभारणारी कंपनी आणि सेवा पुरवठादार कंपन्या यांच्यातील मतभेद कायम राहिले.

Metro network issue Mumbai
Mumbai weather update : उद्यापासून मुंबईत उष्णतेची लाट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news