Metro 4 trial run : मेट्रो 4 ची चाचणी लवकरच

वडाळा-कासारवडवली-गायमुख मार्गिकेच्या ओव्हरहेड वायरमध्ये विद्युतप्रवाह सक्रिय
Metro 4 trial run
मेट्रो 4 ची चाचणी लवकरच pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : वडाळा-कासारवडवली-गायमुख ही मेट्रो 4 व 4 अ मार्गिका अंशत: सुरू करण्याच्या दृष्टीने तांत्रिक कामांना वेग देण्यात आला आहे. या मार्गिकेवर डोंगरीपाडा ते गायमुख स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये विद्युतप्रवाह सक्रिय करण्यात आला. त्यामुळे लवकरच या मार्गिकेवर मेट्रोची चाचणी शक्य आहे.

मेट्रो 4 मार्गिकेचा काही भाग आणि मेट्रो 4 अ मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू करण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये या मार्गिकेवर मेट्रोची पहिली चाचणी होणे अपेक्षित आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच चाचणीसाठीचे मेट्रोचे डबे रुळांवर चढवण्यात आले. गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मार्गावर मेट्रो 4 मार्गिकेचा काही भाग आणि मेट्रो 4 अ ही मार्गिका अशा दोन्ही मार्गिका मिळून 10 स्थानके आहेत. त्यापैकी ठाणे येथील आनंदनगर परिसरात मेट्रोचे डबे रुळांवर चढवण्यात आले.

या 10.5 किमी मार्गिकेवर कॅडबरी, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकूजिनीवाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीवाडा आणि गायमुख या स्थानकांचा समावेश आहे. ही मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर पूर्व उपनगरातील मुंबईकरांनाही मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

नुकतेच या मार्गिकेवरील ओव्हरहेड वायरमध्ये 25 हजार व्होल्टचा विद्युतप्रवाह सक्रिय करण्यात आला. त्यामुळे यापुढे सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही व्यक्तीला परवानगीशिवाय या विद्युत प्रवाही तारांजवळ जाता येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news