Mumbai Metro 4: मेट्रो ४ मार्गिकेसाठी पहिली मेट्रोगाडी तयार; डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत होणार दाखल

अल्स्टॉमकडून मेट्रोगाडीची बांधणी पूर्ण; नोव्हेंबरअखेरीस चाचण्या पूर्ण होण्याची अपेक्षा
Mumbai Metro 4
Mumbai Metro 4Pudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मेट्रो ४ आणि ४ अ मार्गिकेचा गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा पहिला टप्पा लवकरच सुरू होत असून त्यासाठी पहिली मेट्रोगाडी सज्ज झाली आहे. ही गाडी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत दाखल होईल.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वडाळा-ठाणे-कासारवडवली या मार्गावर मेट्रो ४ आणि ४ अ मार्गिका उभारली जात आहे.

Mumbai Metro 4
Mumbai Mega Block: सीएसएमटी - विद्याविहार दरम्यान उद्या मेगा ब्लॉक

या मार्गिकेच्या संचालनासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याचे काम एल ॲण्ड टी मार्फत केले जात आहे. 'एल ॲ ण्ड टी'ने या मार्गिकेसाठी ३९ मेट्रोगाड्यांचे कंत्राट अल्स्टॉमला दिले असून हैदराबादजवळ श्रीसिटी येथे या गाड्यांची बांधणी केली जात आहे.

पहिल्या मेट्रोगाडीची बांधणी पूर्ण झाली असून तिच्या चाचण्याही अंतिम टप्प्यात आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही गाडी पूर्णपणे तयार होईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो ४ मार्गिकेसाठी पहिली मेट्रोगाडी मुंबईत दाखल होईल.

Mumbai Metro 4
Sugar price Hike: दिवाळीच्या फराळावर महागाईचा परिणाम! साखरेचे दर अचानक वाढले; आता किलोसाठी मोजावे लागणार अधिक पैसे

या गाड्यांच्या प्रत्येक डब्यात ८ ते १० चार्जिंग पॉईंट्स बसवण्यात येणार आहेत. हे पॉईंट्स प्रवाशांना सहज वापरता येतील अशा पद्धतीने लावले जाणार आहेत. याशिवाय सायकल घेऊन प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष रॅकची सुविधाही असणार आहे.

वडाळा ते कासारवडवली हा ३२.३२ किमीचा मार्ग असून त्यावर ३० स्थानके आहेत. या मार्गाचे पिअर कॅपचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. हा मार्ग सुरू झाल्यावर पूर्व द्रुतगती महामार्गावरील ताण कमी होणार असून प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आहे.

७० टक्के भारतीय बनावट

मेट्रो ४ मार्गिकेसाठी तयार करण्यात येत असलेली मेट्रोगाडी ७० टक्के भारतीय बनावटीची आहे. विजेचा वापर कमी करण्यासाठी वेगळ्या प्रकारची प्रकाशयोजना करण्यात आली आहे. २२ मीटर लांब व ३.२ मीटर रूंद अशी ही मेट्रोगाडी विनाचालक स्वयंचलित पद्धतीने धावण्यासाठी सज्ज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.