Mumbai Marathi Patrakar Sangh : मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

दिलीप ठाकूर यांना शिरीष कणेकर स्मृती पुरस्कार
Mumbai Marathi Patrakar Sangh
Mumbai Marathi Patrakar SanghPudhari News Network
Published on
Updated on

मुंबई : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांच्यासह तुळशीदास भोईटे, अशोक अडसूळ, सचिन लुंगसे, विवेक दिवाकर, अविनाश कोल्हे व राजेश माळकर यांची यंदाच्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विविध पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली.

दरवर्षी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनी ६ जानेवारीला या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. १० हजार रुपये, गौरव चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदा ज्येष्ठ पत्रकार लेखक पी. साईनाथ यांच्या हस्ते सायंकाळी ६ वा. पत्रकार संघाच्या सभागृहात पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.

यंदा पहिल्यांदाच सिने पत्रकार व व्हिडीओ जर्नालिस्टसाठी संघातर्फे पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. ज्येष्ठ सिनेपत्रकारासाठी शिरीष कणेकर यांच्या पत्नी भारती कणेकर यांनी दिलेल्या देणगीतून पुरस्कार देण्यात आला असून पहिल्या शिरीष कणेकर स्मृती पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर ठरले आहेत. तसेच व्हिडिओ जर्नालिस्ट (कॅमेरामन) कै. वैभव कनगुटकर यांच्या स्मृती जपण्यासाठी उद्योगपती राजू रावल यांच्या देणगीतून वैभव कनगुटकर स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. या पहिल्या पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ व्हिडीओ जर्नालिस्ट राजेश माळकर ठरले आहेत.

Mumbai Marathi Patrakar Sangh
Carbon Dioxide Storage : देशातील पहिली कार्बन डायऑक्साइड साठवणूक विहीर पूर्ण

जयहिंद प्रकाशनातर्फे वर्षातील सर्वोत्तम पुस्तकासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी संपादक तुळशीदास भोईटे यांच्या २०२४, भाजपा जिंकली ! कशी? या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ठ राजकीय बातम्यांसाठी देण्यात येणारा रमेश भोगटे स्मृती पुरस्कार पत्रकार अशोक अडसूळ यांना तर आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार पत्रकार सचिन लुंगसे यांना जाहीर झाला आहे.

तु. कृ. सरमळकर पुरस्कार पत्रकार विवेक दिवाकर यांना तर ललित लेखनासाठीचा विद्याधर गोखले पुरस्कार मुक्त पत्रकार अविनाश कोल्हे यांना जाहिर झाला आहे. या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ पत्रकार योगेश बिडवई, अजय कौतिकवार, अभिजित मुळये व समीर चवरकर यांच्या निवड समितीने काम पाहिले. पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news