Mumbai bus accident news : मानखुर्दमध्ये बेस्टचा अपघात, ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

या अपघातात चार ते पाच प्रवाशी देखील जखमी झाले असल्याची माहिती आहे
Mumbai BEST Bus Accident
Mumbai BEST Bus AccidentPudhari
Published on
Updated on

कुर्ला : भरधाव वेगात असलेली एक बेस्ट बस दुभाजकाला धडकल्याची घटना सोमवारी (दि.20 जुलै) सकाळी मानखुर्द परिसरात घडली आहे. यामध्ये एका ६५ वर्षीय वृद्ध इसमाचा मृत्यू झाला असून चार ते पाच प्रवासी यामध्ये जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mumbai BEST Bus Accident
Dharashiv Accident : अंत्यविधीसाठी निघालेल्या कर्नाटकातील दाम्पत्यावर काळाचा घाला; पत्नी ठार, पती गंभीर

सायन पनवेल मार्गावरील मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरात आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. कुर्ला येथून नवी मुंबईच्या दिशेने ५०१ क्रमांकाची ही बस जात असताना अचानक बस चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर ही बस दुभाजकावर जाऊन धडकली. यावेळी या दुभाजक करून जाणाऱ्या एका पादचाऱ्याला या बसने धडक दिल्यामुळे ते यामध्ये गंभीर जखमी झाले होते. तसेच यामध्ये चार ते पाच प्रवाशी देखील यामध्ये जखमी झाले होते.

Mumbai BEST Bus Accident
Horrific accident : दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; छत्रपती संभाजीनगरच्या ४ तरुणांचा मृत्यू

या सर्वांना तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपकरापूर्वीच यामध्ये भास्कर पांडे (६५) यांचा मृत्यू झाला आहे. तर प्रवाशी वैभव वाघमारे (४१), आणि वाहक बनवरी प्रसाद (५१)हे यामध्ये जखमी झाले असून त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news