

Wall Collapse Injuries in Malvani Mumbai
मालाड : मालवणीत ग्राउंड प्लस २ मजली घराची भिंत आजूबाजूच्या घरांवर पडून झालेल्या दुर्घटनेत ९ जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. १५) मध्यरात्री १ च्या दरम्यान घडली. यात एकाच कुटुंबातील ५ जण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मालवणी गेट क्रमांक मधील एक ग्राउंड प्लस २ मजली घराची भिंत कोसळून आजूबाजूच्या घरावर पडले. त्यात गाढ झोपेत असलेल्या एकाच कुटुंबातील ५ जण जखमी झाले आहेत. यात एका सहा महिन्याची गर्भवती महिला तिची सासू आणि त्यांच्या कुटुंबातील एक पुरुष गंभीर जखमी झाले. या तिघांना कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच दोन चिमुकल्या सहित इतर ६ जण किरकोळ जखमी झाल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.