मुंबई
मुंबईच्या मालाड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. आपले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी एका फळविक्रेत्याने चक्क फळांवर उंदीर मारण्याचे विषारी क्रीम (Rat Poison) लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्याचा हा प्रताप स्थानिक नागरिकांनी पकडला असून, परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.