Bombay High Court: हाताचे चुंबन घेणे म्हणजे आदरातिथ्य नाही; हायकोर्टाने मुंबईच्या टॅक्सीचालकाला सुनावली शिक्षा

mumbai taxi driver harassment case: रॉकी फर्नांडिस असे दोषी टॅक्सीचालकाचे नाव आहे.
Mumbai harassment case
Mumbai harassment casePudhari File Photo
Published on
Updated on

Bombay High Court Judgement mumbai taxi driver harassment case

मुंबई: महिलेच्या हाताचे चुंबन घेणे ही साधी गोष्ट किंवा शिष्टाचार असू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने दिला. पंचतारांकित हॉटेलमधील कर्मचारी महिलेचा विनयभंग व तिचा पाठलाग केल्याप्रकरणी न्यायालयाने टॅक्सीचालकाला दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. रॉकी फर्नांडिस असे दोषी टॅक्सीचालकाचे नाव आहे.

नोव्हेंबर 2023 मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी आरोपी रॉकी फर्नांडिसला न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (विनयभंग) आणि 354(डी) (पाठलाग करणे) अंतर्गत दोषी ठरवले. या गुन्ह्यात दोन वर्षांच्या सश्रम कारावासासह 1,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायदंडाधिकारी प्रशांत घोडके यांनी हा निकाल दिला.

Mumbai harassment case
PM Modi Somnath Visit: सरदार पटेलांमुळे सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार शक्य; नेहरुंनी केला होता विरोध, PM मोदींनी केली टीका

आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी केलेला विचित्र युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला. दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करणारी महिला चर्चगेट स्थानकावरून शेअरिंग टॅक्सीने कामावर जात होती. 11 नोव्हेंबर रोजी टॅक्सीत इतर प्रवासी नसतानाही रॉकी फर्नांडिसने महिलेला बसवून घेतले.

इच्छित स्थळी पोहोचल्यावर महिलेने पैसे देण्याचा प्रयत्न केला असता त्याने पैसे नाकारले. तिला हॅपी दिवाळी म्हणत हात मिळवला आणि अचानक तिच्या हाताचे चुंबन घेतले. त्यानंतर काही दिवसांनी, 21 नोव्हेंबर रोजी पुन्हा रॉकीने महिलेचा पाठलाग केला आणि मोबाईल नंबर मागत तू मला आवडतेस असे म्हटले होते. खटला किल्ला कोर्टात चालला. सर्व उपलब्ध पुरावे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद व महिलेचा जबाब विचारात घेत न्यायालयाने टॅक्सीचालकाला दोषी ठरवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news