Central Railway mega block : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

CSMT ते विद्याविहार मार्गावर परिणाम
Mumbai Central Railway
Mumbai Central RailwayPudhari
Published on
Updated on

मुंबई : विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी दिवसा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार व हार्बर लाईनवरील कुर्ला ते वाशी दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान दोन्ही मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे. यावेळेत धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवल्यामुळे भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबणार आहेत. पुढे विद्याविहार स्थानकावर धीम्या मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. त्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील.

Mumbai Central Railway
Mumbai civic issues : चौपाटी स्वच्छ, कोळीवाडे अस्वच्छ !

बोरिवली - भाईंदर दरम्यान रात्र जम्बो ब्लॉक

२२ आणि २३ ऑगस्टच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वे मार्गातील बोरिवली आणि भाईंदर स्थानक दरम्यान जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवार आणि रविवार मध्यरात्री धीम्या मार्गावर ००.३० ते ४.३० पर्यंत ४ तास हा जम्बो ब्लॉक असणार आहे.

दिवा स्थानकावर तीन दिवस रात्रीचा ब्लॉक

दिवा स्थानकावर कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या बांधकामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या २१,२२ आणि २३ ऑगस्टच्या (शुक्रवार/शनिवारची रात्र) असा सलग तीन रात्री हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटी येथून ००:०८ वाजता कसारासाठी सुटणारी आणि सीएसएमटी येथून ००:१२ वाजता कर्जतसाठी सुटणारी गाडी ठाणे आणि कल्याण स्थानका दरम्यान 'डाऊन' जलद मार्गावर वळवली जाईल. या उपनगरीय गाड्या ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत.

Mumbai Central Railway
Mumbai Goa highway traffic : गणेशोत्सवात यंदाही महामार्गावर वाहतूककोंडीचे विघ्न ?

असा असणार ब्लॉक

मध्यरात्री १.२० ते ३.२० वाजेपर्यंत

  • २१ व २२ ऑगस्ट (शुक्रवार/शनिवारची रात्र)

  • २२ व २३ ऑगस्ट (शनिवार/रविवारची रात्र)

  • २३ व२४ ऑगस्ट (रविवार/सोमवारची रात्र)

  • हार्बर मार्गावर सीएसएमटी येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ दरम्यान वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

  • सीएसएमटी- कुर्ला - सीएसएमटी आणि पनवेल - वाशी - पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news