

मुंबई : Western Railway Mega Block | मस्जिद बंदर स्थानकाजवळील कर्नाक पुलाचा गर्डर उभारण्यासाठी मध्य रेल्वेने २५, २६, ३१ जानेवारी आणि १, २ फेब्रुवारी रोजी रात्री विशेष पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी २५ जानेवारी रात्री सहा तासांचा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची लोकल वाहतूक बंद राहणार आहे. तसेच मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत देखील बदल केला आहे.
ब्लॉक कालावधी रात्री ११.३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत (६तास)
सीएसएमटी-भायखळा दरम्यान अप-डाऊन धिम्या जलद मार्गावर
सीएसएमटी-वडाळा रोड अप-डाऊन मार्गावर
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते भायखळा, वडाळा रोड दरम्यानची वाहतूक बंद
मेन लाईनवरील लोकल भायखळा, कुर्ला, परळ, ठाणेपर्यंत धावणार
हार्बर मार्गावर वडाळापर्यंत लोकल सुरु राहणार
रात्री १२.३० ते मध्यरात्री ३.३० (३ तास)
सीएसएमटी-भायखळा दरम्यान अप-डाऊन धिम्या जलद मार्गावर
सीएसएमटी-वडाळा रोड अप-डाऊन मार्गावर
ब्लॉककालावधीत सीएसएमटी ते भायखळा, वडाळा रोड दरम्यान वाहतूक बंद
ब्लॉक ३ ३१ जानेवारी रात्री
ब्लॉक ४ १ फेब्रुवारी रात्री
ब्लॉक ५ २ फेब्रुवारी रात्री
मध्यरात्री १.३० ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत
१२०५१ सीएसएमटी-मडगाव एक्सप्रेस, २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, १७६१७ सीएसएमटी-नांदेड एक्सप्रेस, २२१०५ सीएसएमटी-पुणे एक्सप्रेस, २२११९ सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस.
१२२९० अजमेर-दादर ३५ मिनिटे, १२९८० जयपूर-वांद्रे २५ मिनिटे, १२९३२ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल डबल डेकर २० मिनिटे, ८२९०२ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल तेजस २० मिनिटे.
१२९३४ अहमदाबाद- मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस ३५ मिनिटे विलंबाने धावेल, १९६५३ अजमेर वांद्रे विशेष एक तास विलंबाने.