Sunday Mega Block Mumbai : रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

यावेळी सीएसएमटी ते पनवेल हार्बर व पनवेल-ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा ६ तास बंद राहणार
Sunday Mega Block Mumbai
Sunday Mega Block Mumbaipudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेने रविवार १५ नोव्हेंबरला मेगा ब्लॉक ची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या मेन व हार्बर मार्गावर हा ब्लॉक राहणार आहे. यावेळी सीएसएमटी ते पनवेल हार्बर व पनवेल-ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा ६ तास बंद राहणार आहे. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री मेगाब्लॉक हुरकण्यात येणार असल्यामुळे रविवारी ब्लॉक राहणार नाही.

मध्य रेल्वे (मेन मार्ग)

  • ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' धिम्या मार्गांवर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ब्लॉक

  • मुलंड येथून सुटणाऱ्या 'डाऊन' धिम्या, अर्ध-जलद लोकल सकाळी १०.४३ ते दुपारी ३.५३ या वेळेत मुलंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान 'डाऊन' जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील.

  • कल्याण येथून सुटणाऱ्या 'अप' धिम्या, अर्ध-जलद लोकल सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ या वेळेत कल्याण ते मुलंड स्थानकांदरम्यान 'अप' मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील.

  • ठाणे लोकल नियोजित 'डाऊन' धिम्या मार्गावरूनच चालतील. सीएसएमटी येथून सुटणाऱ्या व तेथे पोहचणाऱ्या सर्व 'अप' आणि 'डाऊन' धिम्या उपनगरीय रेल्वे सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत १० मिनिटे उशिराने चालतील.

Sunday Mega Block Mumbai
Ratnagiri News : अठराव्या शतकातील ओझर गावातील वतन प्रकरण उलगडले !

हार्बर मार्ग

  • पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळता) 'अप' आणि 'डाऊन' हार्बर मार्गांवर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक

  • पनवेल येथून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या 'अप' हार्बर उपनगरीय रेल्वे सेवा सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ या वेळेत आणि सीएसएमटी येथून बेलापूर, पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या 'डाऊन' हार्बर लोकल सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत रद्द राहतील.

  • ट्रान्स-हार्बर मार्ग पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या ‘अप’ ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सकाळी ११.०२ ते दुपारी १५.५३ या वेळेत सुटतात, आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या ‘डाऊन’ ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा, ज्या सकाळी १०.०१ ते दुपारी १५.२० या वेळेत सुटतात, त्या रद्द करण्यात येणार आहे.

  • ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील. ठाणे-वाशी,नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. पोर्ट मार्गावरील सेवा ब्लॉक कालावधीत सुरू राहतील.

Sunday Mega Block Mumbai
Al Nino Impact on Birds : 'अल्‌ निनो'चा परदेशी पाहुण्यांना फटका

पश्चिम रेल्वे

  • रविवारी ब्लॉक नाही

  • वसई ते वैतरणा रात्रकालीन ब्लॉक

  • अप जलद मार्गावर मध्यरात्री ११.५५ ते २.५५

  • डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १.३० ते पहाटे ४.३०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.