Ghatkopar landslide | मुंबईत घरांवर दरड कोसळून सहाजणांचा मृत्यू, ४ जखमी

झोपेत असताना काळाचा घाला; मृतांची संख्या वाढण्याची भीती
मुंबई : मुंबईच्या घाटकोपर भागात गौसिया चाळीवर दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. या ठिकाणी सुरू असलेले बचाव कार्य.
मुंबई : मुंबईच्या घाटकोपर भागात गौसिया चाळीवर दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. या ठिकाणी सुरू असलेले बचाव कार्य. (पीटीआय फोटो)
Published on
Updated on

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर भागातील चिरागनगर परिसरात गौसिया चाळीवर डोंगराचा मोठा कडा बुधवारी पहाटे दोन ते तीन घरांवर कोसळून किमान सहाजणांचा मृत्यू झाला. चौघे जखमी झाले असून, काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रभर पावसाचा जोर कायम होता. याच दरम्यान, पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास डोंगराचा काही भाग खचला आणि मातीसह मोठमोठे दगड खाली असलेल्या घरांवर कोसळले. सर्वजण गाढ झोपेत असतानाच हा प्रकार घडल्याने नागरिकांना जीव वाचवून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेतील मृतांची ओळख पटवण्यात येत आहे. काहीजण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून, अग्‍निशमन दल, मुंबई महापालिका आणि इतर यंत्रणा युद्धपातळीवर मदत कार्य करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news