

मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत रविवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईला पुन्हा तुंबवले. सकाळी वरळीसह अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्यामुळे संपूर्ण जनजीवनच ठप्प पडले. पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले. अनेक रस्तेही वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास खडतर झाला. आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई शहर व उपनगरात रविवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईला पुन्हा तुंबवले. सकाळी वरळीसह अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्यामुळे संपूर्ण जनजीवनच ठप्प पडले. पश्चिम व मध्य रेल्वेची उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले. अनेक रस्तेही वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे ठीक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास खडतर झाला.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. गेल्या आठवड्यात तर कडक ऊन पडले होते. पण रविवारी रात्रीपासून पावसाने चांगला जोर पकडला. सोमवारी पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला तुंबून टाकले. उपनगरापेक्षा शहरात सर्वाधिक 119 मिमी पाऊस झाला. त्या तुलनेत उपनगरात कमी पाऊस झाला. पश्चिम उपनगरात 77 मिमी तर पूर्व उपनगरा 75 मिमी पावसाची नोंद झाली. पहाटे पावसाचा जोर असल्यामुळे वरळी नाका येथे कधी न तुंबणारे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबल्यामुळे या भागातील संपूर्ण वाहतूक ठप्प पडली. शहरातील अन्य भागातही पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. पावसाचा जोर यामुळे पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावरील लोकल तब्बल 20 ते 25 मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे सकाळी वसई विरार आधी भागातून कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा प्रवास अर्ध्या तासाने लांबला.
ठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे व पावसाचा जोर यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे मंदावली. पश्चिम द्रुतगती महामार्गासह एस. व्ही. रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, काळबादेवी रोड, डी. एन. रोड, दक्षिण मुंबई नरिमन पॉईंट व वरळी लोअर परेल भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे सकाळी उपनगरातून दक्षिण मुंबईत जाणारी वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडली. सकाळी दहा वाजल्यानंतर पावसाचा जोर उतरल्यामुळे पाण्याचा निचरा झाला. त्यामुळे संध्याकाळी वाहतूक सुरळीत झाली होती.