Mumbai Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत; कशेडीजवळ दरड कोसळली

वाहतूक सुरळीत करण्यासाठी वेगात उपायोजना
Kashedi tunnel reopens for traffic
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगदा (छाया : अनुज जोशी)
Published on
Updated on

Kashedi Ghat Landslide

नवी मुंबई : मुंबई-गोवा महामार्गा वर कशेडीजवळ येथे दरड कोसळली आहे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडून गोवा जाणारी वाहतूक प्रभावित झालेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या यंत्रणेकडून अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्यासाठी काम केले जात आहे. परिसरात पाऊस व वारा जोरदार आहे. दरडचा काही भाग जवळ घरांच्या परिसरात आल्याने त्या परिसरातील लोकांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

वरंधा घाटात दरडी कोसळल्यामुळे सध्या रस्ता रस्ता बंद आहे. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसात वरंधा घाटातील वारवंड ते उंबर्डे हद्दीदरम्यान चार पाच ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर आल्या आहेत. सध्या रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दरडी हटवण्याचे काम सुरु आहे.

Kashedi tunnel reopens for traffic
Kashedi Ghat landslide | कशेडी घाटात महामार्गावर मातीचा ओसारा ; एकेरी वाहतूक सुरु

रायगड जिल्हा मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातील बार्जेस वाहून आल्याने पुलाजवळ अडकल्या आहेत. पुलाला धोका असल्याने तात्पुरती मंडणगड - म्हाप्रळ गोरेगाव - माणगाव वाहतूक बंद केली आहे. सदर जागी पोलीस विभाग, महसूल , सार्वजनिक बांधकाम विभाग , जिल्हा परिषद यांचे वतीने आवश्यक उपाययोजना सुरू आहेत.

पेण -खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यातील कानसळ येथील अंबा नदीजवळ फसलेले 12 कामगार यांना बचाव करत सुखरूप बाहेर काढले आहे अशी माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

Kashedi tunnel reopens for traffic
Kashedi Ghat News: वरंधा, कशेडी घाटातील धोकादायक दरडींचा बंदोबस्त कधी ?

पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद होणे किंवा इतर कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ संबंधित यंत्रणेशी क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news