मुंबई-गोवा महामार्गावर ३ दिवसांचा ब्लॉक

मुंबई-गोवा महामार्गावर ११ ते १३ जुलै दरम्‍यान २ सत्रात ब्‍लॉक घेण्यात येणार
mumbai goa highway to be blocked 4 hours daily from 11 to 13 july 2024
मुंबई-गोवा महामार्गावर ११ ते १३ जुलै दरम्‍यान २ सत्रात ब्‍लॉकFile Photo

पुढारी वृत्‍तसेवा :

कोलाड जवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्यचे काम होणार आहे. त्‍यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर ११ जुलै ते १३ जुलै दरम्यान सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या दोन सत्रात ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत ते पुढीलप्रमाणे...

mumbai goa highway to be blocked 4 hours daily from 11 to 13 july 2024
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे फॉर्म भरून घेताना अंगणवाडी सेविकेचे निधन

यामध्ये वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा-कालाड मार्गे पुन्हा मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.

वाकण फाटा येथून पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगांव वरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.

mumbai goa highway to be blocked 4 hours daily from 11 to 13 july 2024
Margaon-Mumbai Railway| मडगाव-मुंबई वाहतूक पूर्णत: ठप्प; कोकण रेल्वेने रद्द केल्या गाड्या

खोपोली-पाली-वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगांव वरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.

mumbai goa highway to be blocked 4 hours daily from 11 to 13 july 2024
Maharashtra Monsoon update | पुन्हा मुसळधार! राज्यातील 'या' भागांत यलो अलर्ट जारी

या कालावधीत गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे...

१) कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड-वाकण फाटा किंवा नागोठणे वरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.

२) कोलाड येथून रवाळजे-पाली वरून वळवून वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.

३) कोलाड येथून रवाळजे-पाली-वाकण फाटा वरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.

सर्व प्रवाशांनी या कालावधीत पर्यायी मार्ग वापरुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news