Mumbai Eviction Stop | गणेशोत्सवात मुंबईतील पाडापाडी बंद, महसूलमंत्र्यांचे आदेश, मात्र अशा लोकांना अभय नाही

Revenue Minister Order | उत्तर मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेली कारवाई थांबवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्ट आदेश
Chandrashekhar Bavankule Order
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे File Photo
Published on
Updated on
Summary

* उत्तर मुंबईतील पाडकाम गणेशोत्सवापर्यंत थांबवा

* प्रशासनाने नागरिकांना कोणतीही नोटिस देऊ नका

* बनावट नकाशे देणाऱ्यांना अभय नाही

Maharashtra Government Decision

मुंबई : ​सणासुदीच्या काळात लोकांना घराच्या पाडकामाबाबतच्या नोटीसा देऊन त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण तयार करु नका. जी कारवाई करायची असेल, ती गणेशोत्सवानंतरच करा. अधिकाऱ्यांनी लोकांना कोणत्याही नोटिसा देऊ नये.

उत्तर मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेली कारवाई थांबवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. तर नागरिकांनी केलेली बांधकामे अनधिकृत असल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे. नागरिकांनी केलेल्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही कारवाई गणेशोत्सवापर्यंत थांबविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, बनावट नकाशे तयार करून बांधकामे केलेल्यांना अभय मिळणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Chandrashekhar Bavankule Order
Mumbai Rains: मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गही पाण्याखाली, भाईंदरमध्ये घरांमध्ये पाणी शिरले

मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. भाजपा उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष दीपक तावडे व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Chandrashekhar Bavankule Order
Mumbai rain: मुंबईत मुसळधार, लोकल मात्र सुरळीत; ३६ तासांत ४०९ मिमी विक्रमी पाऊस!

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, उत्तर मुंबईतील बांधकामबाबत चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने ८८४ हद्द कायम नकाशांपैकी १६५ नकाशांमध्ये व नगर भूमापन अधिकारी गोरेगाव यांच्या अभिलेखातील नगर भूमापन चौकशीच्या वेळचे ९ आलेखात छेडछाड झाल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार महापालिकेने अनधिकृत ठरलेली बांधकामे पाडण्यास सुरुवात केली आहे. चुकीचे नकाशे बनवून बांधकाम केलेल्यांना अभय मिळणार नाही. मात्र, २०११ पूर्वी ज्यांची बांधकामे आहेत त्यांना नियमानुसार काही सवलती देण्यात येतील. यासाठी गणेशोत्सवापर्यंत महापालिकेने पाडकाम करु नये. त्यानंतर महापालिका कार्यालयात सविस्तर बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news