मुंबई : कांदिवली पश्चिम लिंक रोड येथील लालजीपाडा परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची घटना सोमवारी (दि.२७) रात्री उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आग्निशामक दलाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यामध्ये हॉटेल व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले असून ही आग कशामुळे लागली? याचे कारण अस्पष्ट आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.