FDA Action: बसमधून मिठाईची धोकादायक 'तस्करी' एफडीएकडून चेंबूरमध्ये ११ लाखांचा ४ हजार किलो भेसळयुक्त साठा जप्त

टिळकनगर पोलीस ठाण्याजवळ एफडीएची कारवाई; तापमान नियंत्रणाशिवाय आणि अस्वच्छ वातावरणात मिठाईची वाहतूक.
FDA Action
FDA Actionpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: सणासुदीच्या काळात मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा एक धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उघडकीस आणला आहे.

राज्यातील नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, चेंबूरमध्ये एका लक्झरी बसमधून अस्वच्छ व असुरक्षित पद्धतीने वाहतूक केला जाणारा ४ हजार २ किलो मिठाई व स्वीट हलव्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या या साठ्याची किंमत ११ लाख ११ हजार १७४ रुपये आहे.

FDA Action
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! आणखी १० टक्के पाणीकपातीचा विचार

२ नोव्हेंबर रोजी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील टिळकनगर पोलीस ठाण्याजवळ एफडीएच्या पथकाकडून 'तानिया ट्रॅव्हल्स'च्या एका लक्झरी बसला संशयावरून अडवण्यात आले. या बसची तपासणी केली असता, प्रवाशांच्या बसमध्ये कोणत्याही नियंत्रित तापमानाशिवाय व अत्यंत अस्वच्छ वातावरणात या मिठाईची व हलव्याची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.

या ब्रँड्सची मिठाई झाली जप्त

एफडीएने फौजदारी कारवाई करताना नंदी इंडियन स्वीट हलवा, श्री गोकुळ ट्रेडिशनल स्वीट्स, गोपाल स्वीट बर्फी, श्री बन्सीधर स्वीट हलवा या नामांकित ब्रँड्सच्या मिठाईचा साठा ताब्यात घेतला आहे. या कारवाईमुळे सणासुदीत भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

FDA Action
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! आणखी १० टक्के पाणीकपातीचा विचार

अहवाल आल्यावर कायदेशीर कारवाई

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे ६ विविध नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. हा प्रयोगशाळा अहवाल हाती येताच संबंधितांवर 'अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६' नुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.