तेजस, जनशताब्दीसह ९ एक्स्प्रेस ३१ डिसेंबरपर्यंत दादर स्थानकापर्यंतच

Mumbai Railway updates | मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्ताराचे होणार काम
Mumbai Railway updates
तेजस, जनशताब्दीसह ९ एक्स्प्रेस ३१ डिसेंबरपर्यंत दादर स्थानकापर्यंतचfile photo
Published on
Updated on

मुंबई : सीएसएमटी टर्मिनसमधून २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस चालविण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ चा विस्तार करण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या ९ मेल-एक्स्प्रेस ३१ डिसेंबरपर्यंत सीएसएमटी स्थानकापर्यंत न चालविता दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे.

वेगवान आणि किफायतशीर दरामुळे रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसची प्रवासी संख्या दिवसागणिक वाढते आहे. वाढत्या प्रवासीसंख्येमुळे गाड्यांची वेटिंग लिस्ट वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नाही. परिणामी, रेल्वे बोर्डाने प्रवासी गर्दी विभागण्यासाठी मेल-एक्स्प्रेसचे डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी देशातील क्षेत्रीय रेल्वेला जास्तीत जास्त २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस चालविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १२-१३ ची लांबी वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर २४ डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी सीएसएमटीमध्ये चार प्लॅटफॉर्म उपलब्ध होतील.

या गाड्यांना फटका

२२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, १२०५२ मडगाव-मुंबई जनशताब्दी, १२८१० हावडा-सीएसएमटी, ११४०२ अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम, १२११२ अमरावती-सीएसएमटी, २२१०८ लातूर सीएसएमटी आणि २२१४४ बिदर-सीएसएमटी, ११०२० भुनवनेश्वर-सीएसएमटी यांचा प्रवास दादर स्थानकातच रद्द करण्यात येणार आहे. १२१३४ मंगळुरू-सीएसएमटी गाडी ठाणे स्थानकात रद्द करण्यात येणार आहे. त्यानंतर रिकामी गाडी स्वच्छतेसाठी यार्डात जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news