

मुंबई : मुंबईत बहुतांश नाले उघडे असल्यामुळे झोपडपट्टीतून मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो. रात्रीच्या वेळी डेब्रिजही टाकण्यात येते. यासाठी आता नाल्याच्या दोन्ही बाजूला प्रतिबंधित जाळ्या बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
लोखंडी प्रतिबंधक जाळी लावण्याची कार्यवाही तातडीने करावी असे निर्देश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. 10 ते 15 फूट उंच लोखंडी प्रतिबंधक जाळी बसविण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
या नाल्यांवर प्राधान्याने जाळ्या बसवणार :
घाटकोपर (पूर्व) येथे छेडा नगर जंक्शनजवळ सोमय्या नाला, कुर्ला स्थित माहुल खाडी नाला, शिवडी-चेंबूर रस्त्यावर माहुल खाडी नाला, वडाळा येथे रावळी निम्नस्तर नाला, कुर्ला (पूर्व) येथील नेहरूनगर नाला, धारावी टी जंक्शन येथे दादर-धारावी नाला आधीच्या दोन्ही बाजूला प्राधान्याने जाळ्या बसवण्यात येणार आहेत.