Marathi Row: चूक माझीच आता मराठी शिकणार, जय महाराष्ट्र; मुंबईतल्या व्हायरल व्हिडिओनंतर डिलिव्हरी बॉयचा माफीनामा

Mumbai Delivery Boy Apology Controversy: ऑर्डरवरून सुरू झालेला हा वाद हळूहळू भाषेवर पोहोचला आणि अवघ्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाषिक वाद उफाळून आला.
Mumbai Domino's Pizza Delivery Controversy
Mumbai Domino's Pizza Delivery ControversyX
Published on
Updated on

Mumbai Delivery Boy Marathi Controversy Video

मुंबई : मुंबईत मराठीविरुद्ध इतर भाषिक वाद वाढत असतानाच एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियावर गेल्या चार दिवसांपासून व्हायरल झाला आहे. मराठी बोलण्यावरुन ग्राहकाने डिलिव्हरी बॉयसोबत हुज्जत घातली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून पडसाद उमटले. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या वादात उडी मारल्याने डिलिव्हरी बॉयने माफी मागितली आहे. "मी मराठीत बोलणार आणि शिकणारही" असं सांगत त्या डिलिव्हरी बॉयने हात जोडून माफी मागितली आहे.

Mumbai Domino's Pizza Delivery Controversy
Operation Sindoor : मसूदला पाक सरकारकडून मिळणार 14 कोटींची ‘भरपाई’

वाद नेमका कशावरून झाला?

भांडूपमध्ये राहणाऱ्या वैदेही पाठक या डेंटिस्ट असून 1० मे रोजी पाठक आणि त्यांच्या मुलाने App वरून खाद्यपदार्थ मागवले होते.  वैदेही पाठक यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला घटनाक्रम सांगितला. डिलिव्हरनंतर बॉक्स उघडून पिझा तपासू दे मगच पैसे देणार, असे पाठक यांच्या मुलाचे म्हणणे होते. पण डिलिव्हरी बॉयने यासाठी नकार दिला. बॉक्स उघडला तर पैसे द्यावेच लागतील असं त्याचं म्हणणं होतं. यादरम्यान पाठक यांच्या मुलाने डिलिव्हरी बॉय रोहितला सांगितलं तू मराठीत बोल. ऑर्डरवरून सुरू झालेला हा वाद हळूहळू भाषेवर पोहोचला आणि अवघ्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाषिक वाद उफाळून आला.

'मराठीत बोल नाही तर हरयाणात परत जा'

पाठक यांच्यानुसार, आम्ही त्या डिलिव्हरी बॉयला मराठीत बोलायला सांगितलं कारण तो हरयाणवीमिश्रित हिंदी बोलत होता. आम्हाला ते कळत नव्हतं. म्हणून त्याला मराठीत बोल असं सांगितलं. पण त्याने मराठी बोलण्यास नकार दिला आणि वाद चिघळला. हा सगळा वाद रोहितने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि रायडर्सच्या ग्रुपवर टाकला. तिथूनच तो व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओनुसार पाठक या रोहितला म्हणाल्या "मराठीत बोलल्याशिवाय पैसे देणार नाही. तुम्हाला मराठीत बोलता येत नसेल तर तुमच्या हरयाणात परत जा". या व्हिडिओवरुन सोशल मीडियावरही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

डिलिव्हरी बॉयने मागितली माफी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादात उडी घेत डिलिव्हरी बॉय रोहितला गाठले. मनसेच्या कार्यालयात उभं राहून रोहित माफी मागताना दिसत आहे. 'त्या मॅडम खूप चांगल्या होत्या. त्यांनी खरं तर मला पैसेही दिले होते. पण मी ज्या ग्रुपवर व्हिडिओ टाकला तिथूनच तो व्हायरल झाला. मी त्यांची माफी मागतो' असं रोहितनं म्हटलंय. 'मी आता मराठी बोलणार आणि शिकणारही आहे. जय महाराष्ट्र', असं म्हणत रोहितने वादावर पडदा टाकलाय. दरम्यान या प्रकरणी महिलेने रोहितविरोधात भांडुप पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news