Aashadhi festival food Mumbai : आषाढीला मुंबईकर फस्त करणार 30 टन साबुदाणा, 15 टन भगर

किरकोळ बाजारात साबुदाणा 120 तर भगर 160 रुपये किलो; श्रावण महिन्यात आणखी दरवाढ होणार
Aashadhi festival food Mumbai
आषाढीला मुंबईकर फस्त करणार 30 टन साबुदाणा, 15 टन भगरpudhari photo
Published on
Updated on
नवी मुंबई: राजेंद्र पाटील

आषाढी एकादशी निमित्त भगर आणि साबुदाण्याच्या दरात गेल्या 15 दिवसात भगरच्या दरात 10 ते 15 रुपयांनी वाढ झाली असून साबुदाण्याचे दर 35 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र किरकोळ बाजारात साबुदाणा, भगरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अशी माहिती घाऊक व्यापारी राजूभाई चोप्रा यांनी दिली. आषाढीला उपवासासाठी गेल्या 20 दिवसात किरकोळ व्यापार्‍यांनी 30 टन साबुदाणा आणि 15 टन भगर विक्री केली.

एपीएमसीत साबुदाणा 43 ते 46 रुपये किलो असून किरकोळला 120 रुपये, मॉलमध्ये 80 पॉकिंग 80 तर सुट्टा साबुदाणा 55 ते 60 रुपये किलो आहे.तर एपीएमसीत भगर 96 ते 105 रुपये किलो तर किरकोळला 160 रुपये किलो आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साबुदाणाला उठाव फासा नाही. साबुदाण्याचे दर 35 टक्क्यांनी कमी झाल्याची माहीती व्यापारी राजूभाई चोप्रा यांनी दिली. एपीएमसीत नियमित विक्री होणार पांढरा गुलाबला अधिक मागणी असून हा साबुदाणा 43 ते 45 रुपये किलो आहे. हाच साबुदाणा किरकोळ बाजारात 115 ते 120 रुपये किलो आहे. किरकोळ बाजारात किलोमागे 75 रुपयांची दरवाढ झाल्याचे दिसून आले.

श्रावण महिन्यांत आणखी दरवाढ होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. एपीएमसी साबुदाण्याला सुरुवातीला उठाव चांगला होता. मात्र आता उठाव कमी झाला. दररोज 25 ते 30 टन म्हणजे सुमारे 450 गोणी (50 किलो) विक्री होते. उपवासामुळे साबुदाण्याला उठाव आहे. साबुदाण्याची आवक ही तामिळनाडू येथील सेलम येथुन होते. त्यामध्ये डॉल्फिन, नॉयलॉन, मोती, गुलाब, पांढरा गुलाब या प्रकारच्या साबुदाणा तयार केला जातो. याला बाजारपेठांमधून मोठी मागणी असते.

पांढरा गुलाब साबुदाणा आवडीचा

सर्वाधिक मागणी ही पांढरा गुलाब साबुदाण्याला आहे. घाऊकला भगर 95 ते 105 रुपये किलो तर किरकोळला 160 रुपये किलो दराने व्रिकी केली जाते. घाऊकपेक्षा किरकोळ बाजारात भगर 55 रुपये किलो अधिक दराने विकली जात आहे. भगरची आवक नाशिक, घोटी आणि शहापूर या तालुक्यातुन एपीएमसीत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news