मुंबई : तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास सर्वच तलाव भरत आले असून भातसा, मध्य वैतरणा व अप्पर वैतरणा तलाव भरण्यासाठी अवघ्या दीड टक्के पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. सध्या सातही तलावातील पाणीसाठा ९८.४९ टक्केवर पोहचला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावापैकी मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. अन्य भातसा, अपर वैतरणा व मध्य वैतरणा ही हे तलावधी जवळपास परत आले असून उचलून वाहण्यासाठी दिड टक्के म्हणजे २२ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मुसळधार पाऊस असाच सुरू राहिला तर येत्या दोन-तीन दिवसात तलावातील पाणीसाठा १०० टक्केवर पोहचेल. भातसा तलावातील पाणीसाठा ९८.१३ टक्केवर पोहचला असून हा तलाव ओसंडून वाहण्यासाठी १४ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.
नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलाव भरण्यासाठी अवघ्या ३ हजार दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता आहे. तर मध्यवताना तलाव भरण्यासाठी २ हजार दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता आहे. सातही तलावामध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. १५ सप्टेंबर सकाळी ६ वाजेपर्यंत या सातही तलावांमध्ये १४ लाख २५ हजार ५७४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा झाला आहे.
तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये) व टक्केवारी
अप्पर वैतरणा - २,२४,१५४ (९८.७३ टक्के)
मोडक सागर - १,२८,२२९ ( १०० टक्के)
तानसा - १,४२,५३४ ( १०० टक्के)
मध्य वैतरणा - १,९१,३२० ( ९८.८६ टक्के)
भातसा - ७,०३,५९४ ( ९८.१३ टक्के)
विहार - २७,६९८ ( १०० टक्के)
तुळशी - ८,०४६ ( १०० टक्के)