

Dahisar Dahi Handi Govinda Death News
मुंबई : दहीहंडीचा सराव करताना ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना दहिसर भागात आज (दि.११) घडली. महेश रमेश जाधव (वय ११, रा. दहिसर, केतकीपाडा) असे मृत गोविंदाचे नाव आहे. पथकासोबत थर लावत असताना तोल जाऊन उंचावरून खाली पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोकाकूल वातावरण आहे.
महेश हा आपल्या गोविंदा पथकासोबत सराव करत होता. यावेळी अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट खाली उंचावरून कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाली. महेशला तातडीने रूग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तर गोविंदांचा जीव धोक्यात घालणाऱ्या सराव पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सरावादरम्यान खाली फार माणसं नव्हती, असंही समजतंय. महेश हा दहिसरच्या
तज्ज्ञांच्या मते गोविंदानी दहीहंडीचा सराव करत असताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, मॅट्रेस अशा काही महत्त्वाच्या सुरक्षा साधनांचा वापर करायलाच हवा. तसेच प्रशिक्षण देणारी व्यक्तीही योग्य देखरेख करणारी असावी. सुरक्षेत हयगय झाल्याने अशा गोष्टी घडतात. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि सामाजिक संघटनांनी शासनाकडे मागणी केली आहे की, दहीहंडी सराव व स्पर्धांसाठी कठोर सुरक्षा नियमावली तयार करावी. जेणेकरून अशा घटना भविष्यात टाळता येतील तसेच शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून या पीडित कुटुंबाला एकूण पाच लाखांची मदत देण्यात आली आहे.